पाचोऱ्यात शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा; वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शाळांना नोटीस बोर्ड भेट

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा, दि. १९ जून २०२५: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन पाचोऱ्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला आहे. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महादेव मंदिरात पूजन, अभिषेक आणि आरतीने झाली असून त्यानंतर शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले असून वैशालीताई सूर्यवंशी यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना म्हटले, संकटात सावरून उभे राहणे हीच खरी शिवसेना! उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांचे जिवंत रूप आहेत. त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहूया
वर्धापन दिनाचे औचित्य साधून समाजसेवेचा वसा जपत पाचोरा आणि भडगाव येथील जिल्हा परिषद शाळांना नोटीस बोर्ड भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. पाचोऱ्यातील कृष्णराव सोसायटी, सिंधी कॉलनी आणि भडगाव येथील जय हिंद कॉलनी, टोणगाव शाळांना नोटीस बोर्ड प्रदान करत शैक्षणिक विकासासाठी ठोस पाऊल उचलले गेले.
या प्रसंगी ॲड. अभय पाटील, योजनाताई पाटील, मनीषा पाटील, द्वारकाबाई सोनवणे, अनिल सावंत, शशिकांत पाटील, मनोज चौधरी, अभिषेक खंडेलवाल, हरीश देवरे, खंडू सोनवणे, चेतन पाटील, माधव जगताप, भैया भाऊ सूर्यवंशी, रतन परदेशी, विजय साळुंखे, राजू चव्हाण, अरुण तांबे, ज्ञानेश्वर चौधरी, सिकंदर तडवी, गजू पाटील, रमेश पाटील, मिथुन वाघ, पंढरी पाटील, एकनाथ महाराज, संजय चौधरी, राजधर आबा, गोविंद पाटील, अकिल शेख, सलीम खान, नितीन महाजन, आवेश खान, नामदेव चौधरी, आवेश खाटीक, अजय तेली, निकित पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.






