पाचोऱ्यात योग दिनी भाजप सदस्य नोंदणी अभियानाला माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली होणार सुरुवात

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा, दि. १९ जून २०२५ : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी (भाजप) पाचोरा शहरातर्फे २१ जून रोजी सदस्य नोंदणी अभियानाला उत्साहात सुरुवात होणार आहे. सकाळी ९ वाजता आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी कार्यकर्ता शिबिर आणि १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभियानाचा शुभारंभ होईल. माजी आमदार वाघ यांच्या नेतृत्वात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार असून या अभियानात पक्षाच्या धोरणांचा प्रसार, विकासकामांची माहिती आणि नव्या सदस्यांची नोंदणी हा उद्देश आहे. कार्यकर्ता शिबिरात संघटन बांधणी, समाजमाध्यमांचा वापर आणि जनसंपर्कावर मार्गदर्शन होईल. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पारदर्शक नोंदणी प्रक्रिया राबवली जाईल. युवा मोर्चा, महिला मोर्चा, व्यापारी आघाडी यांचा सक्रिय सहभाग असेल अशी माहिती वाघ यांनी दिली आहे.
‘शरीर सुदृढ, संघटना बळकट’ हा संदेश देत, योग दिनी सामाजिक जागृती आणि आरोग्यावरही भर दिला जाणार असून नागरिकांनी सदस्यत्व घेऊन राष्ट्रनिर्मितीत सहभागी व्हावे, असे आवाहन पाचोरा भाजप या माध्यमातून करण्यात आले आहे.