जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारण
पाचोरा पीपल्स बँकेचे नवनिर्वाचित संचालक डॉ. आनंद पाटील यांचा अनिल महाजन यांच्याकडून सत्कार

पाचोरा, दि. २ ऑगस्ट २०२५ | पाचोरा पीपल्स बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अतुल संघवी यांच्या पॅनलकडून उमेदवारी करणारे डॉ. आनंद पाटील यांनी विजय मिळवला आहे. या यशाबद्दल ज्येष्ठ पत्रकार व ओबीसी नेते अनिल महाजन यांनी डॉ. पाटील यांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार प्रसंगी अनिल महाजन यांनी डॉ. पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करत बँकेच्या प्रगतीसाठी त्यांच्या योगदानाबाबत विश्वास व्यक्त केला.