पाचोरा:लाचखोर ग्रामसेवक आणि रोजगार सेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; ५००० रुपयांच्या लाचेसह रंगेहाथ पकडले
जळगाव, दि. २३ जून २०२५: जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील मांडकी येथील ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ (वय ४७, रा. पाचोरा) आणि रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८, रा. पाचोरा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ५००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आणि गट नंबर नमुना आठ मिळवण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ६००० रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ५००० रुपये स्वीकारताना त्यांना सापळा कारवाईद्वारे ताब्यात घेण्यात आले.
सापळा कारवाई
एसीबी जळगाव यांना २३ जून २०२५ रोजी मांडकी येतिल एका ३५ वर्षीय व्यक्तिकडून तक्रार मिळाली होती की, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक त्यांच्या मंजूर घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आणि गट नंबर नमुना आठ देण्यासाठी ६००० रुपयांची लाच मागत आहेत. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने पाचोरा येथे सापळा रचला. पंचांसमक्ष तडजोडीअंती ५००० रुपये लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. हस्तगत रक्कम ५००० रुपये जप्त करण्यात आली आहे.
कारवाईचे नेतृत्व
या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर (मो. ९७०२४३३१३१) यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (नंदुरबार) आणि तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव (जळगाव) यांनी काम पाहिले. सापळा पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील, विलास पाटील, पोलीस नाईक हेमंत पाटील आणि सुभाष पावरा यांचा समावेश होता. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (नाशिक परिक्षेच्या, मो. ९३७१) यांनी केले.
गुन्हा नोंद
आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींचे सक्षम अधिकारी, भडगाव पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत कळवण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
एसीबी जळगावने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अथवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. संपर्कासाठी:
- दूरध्वनी: ०२५७-२२३५४७७
- मोबाइल: ९७०२४३३१३१
- टोल फ्री: १०६४
- पत्ता: अँन्टी करप्शन ब्युरो, अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव
- अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव






