लोहारा येथील मराठी मुलींच्या कन्या शाळेत अनाथ विद्यार्थिनीला शालेय साहित्य वाटप

मधुर खान्देश वृत्तसेवा | लोहारा, ता. पाचोरा, दि. २५ जून २०२५ येथील मराठी मुलींच्या कन्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अनाथ विद्यार्थिनी कु. हिमानशी महेश खैरनार हिला अण्णाभाऊ बेलदार यांच्या संकल्पनेतून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पाचोरा उपविभागीय कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार श्री. सुभाष कुंभार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक पवार, ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके, लोहारा येथील विविध कार्यकारी सोसायटीचे लिपिक मनोज आंबेकर, शाळेतील उपशिक्षक श्री. कृष्णा तपोने आणि श्री. विलास निकम, तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. यावेळी कु. हिमानशीच्या आजी श्रीमती रत्नाबाई दिलीप सूर्यवंशी याही उपस्थित होत्या.
या उपक्रमाद्वारे अनाथ विद्यार्थिनीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा आणि तिला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी हिमानशीला शुभेच्छा देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली.