जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोऱ्यात २६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

पाचोरा, दि. २५ जून २०२५ (प्रतिनिधी): पाचोरा शहरात २६ जून २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत व्यापारी भवन, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध विभागांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना मिळणार आहे.
शिबिरातील प्रमुख विभाग आणि सुविधा:
- संजय गांधी योजना शाखा: संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनांसाठी अर्ज स्वीकारले जातील. पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जातील.
- पुरवठा विभाग: शिधापत्रिकेत नाव कमी/जास्त करणे, नवीन शिधापत्रिका, अन्नधान्य सुरू करण्यासाठी अर्ज आणि माहिती.
- पीएम किसान सन्मान निधी: पात्र लाभार्थ्यांचे अर्ज, त्रुटी सुधारणा आणि योजनेची माहिती.
- कृषी विभाग: शेती अवजारे, पाईप, ठिबक सिंचन योजनांसाठी अर्ज आणि मार्गदर्शन.
- विद्युत वितरण (MSEB): नवीन मीटर/जोडणी अर्ज, थकीत बिलांचे निरसन, कुसुम सोलर, सूर्यघर सोलर योजनांची माहिती.
- पंचायत समिती: अनुदान विहीर, शेड, गोटा शेड, EGS अंतर्गत रोजगार निर्मिती योजनांची माहिती आणि अर्ज.
- वन विभाग/सामाजिक वनीकरण: वृक्ष लागवड, मोफत रोपवाटप, वन योजनांची माहिती.
- भूमी अभिलेख: शेतमोजणी, पो.ख. क्षेत्र प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, अर्जाची माहिती.
- आपले सरकार सेवा केंद्र/CSC: उत्पन्न दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, जातीचे दाखले यासाठी अर्ज.
- राष्ट्रीयकृत बँक: नवीन खाते उघडणे, कर्ज मार्गदर्शन.
- महसूल विभाग: ७/१२, उत्पन्न दाखला, विविध योजनांची माहिती.
- RTO: ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, नवीन नंबर प्लेट माहिती.
- परिवहन महामंडळ: विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक/महिला योजनांची माहिती.
- पोलिस/वाहतूक शाखा: कायदे, वाहतूक नियम, सुरक्षेबाबत माहिती.
- वैद्यकीय अधिकारी (ग्रामीण रुग्णालय): आरोग्य तपासणी (BP, शुगर), मोफत शस्त्रक्रियेसाठी कागदपत्र माहिती.
- महिला व बाल विकास: लाडकी बहीण मानधन, महिला योजनांची माहिती.
- शिक्षण विभाग: शैक्षणिक सुविधांचा लाभ.
- पशु वैद्यकीय: पशुपालन योजना, लसीकरण, सबसिडी माहिती.
- BSNL: मोबाइल/लँडलाइन जोडणी, Wi-Fi/डेटा प्लॅन माहिती.
- नगरपालिका: प्रधानमंत्री/रमाई घरकुल योजना, जन्म-मृत्यू नोंदणी, मालमत्ता उतारा, नवीन नळ जोडणी, बांधकाम परवानगी.
- सहकार विभाग: सोसायटी कर्ज माहिती.
सदर शिबिरात सर्व विभाग एकाच ठिकाणी सेवा देण्यासाठी उपस्थित राहणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- पाचोरा प्रतिनिधी