पाचोऱ्यातील प्रा.छाया प्रल्हाद पाटील यांना ‘जीवशास्त्र’ विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

पाचोरा, दि. २५ जून २०२५: येथील एम. एम. कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. छाया पाटील यांना जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बॉटनी विषयात पीएच.डी. पदवी घोषित झाली आहे. धुळ्याचे प्रा. डॉ. संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही पदवी प्राप्त केली. या पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. दत्ता ढाले यांनी काम पाहिले, तर गुजरातच्या कैलाश पटेल यांनी बहिस्थ परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. धुळ्याच्या एस. एस. व्ही. पी. एस. कॉलेजचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी डॉ. छाया पाटील यांचे अभिनंदन केले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. एस. पाटील, पर्यवेक्षक डॉ. जे. पी. बडगुजर यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, किमान कौशल्य विभाग आणि ग्रंथालय विभागातर्फे डॉ. छाया पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
डॉ. छाया पाटील यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.