जळगाव जिल्हाताज्या बातम्या
देवगाव देवळीत २६ जून पासून पाच दिवसीय रामचरित मानस-राम कथेचे भव्य आयोजन

देवगाव देवळी, दि. 26 जून 2025: अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथे दिनांक 26 जून ते 30 जून 2025 या कालावधीत रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत भव्य 5 दिवसीय रामचरित मानस-राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा प्रयागराज येथून आलेले ह.भ.प. ब्रम्हाशंकर पांडे महाराज यांच्या श्रीमुख वाणीतून सादर होणार आहे. कथास्थळ आदिशक्ती आशापुरी माता मंदिर येथे असून, पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य रामकथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कथेचे ठिकाण व वेळ: आदिशक्ती आशापुरी माता मंदिर, देवगाव देवळी
वेळ: रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत