जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोऱ्यात शिवसेना (शिंदे गटचा) ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

पाचोरा, दि. १९ जून २०२५: शिवसेना (शिंदे गटचा) ५९ वा वर्धापन दिन पाचोरा शहरातील शिवतीर्थ शिवसेना कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, शहरप्रमुख सुमित सावंत, जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार, बापू हटकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उत्साहपूर्ण सोहळ्यात शिवसेनेच्या विचारधारेप्रती कटिबद्धता आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या कार्याला पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.