जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलला सामूहिक विश्वशांतीसाठी सामूहीक नवकार महामंत्र प्रार्थना!

मधुर खान्देश वृत्तसेवा: दि.९ एप्रिल २०२५ बुधवार सकाळी जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा येथे सामूहिक विश्वशांतीसाठी सामूहीक नवकार महामंत्र प्रार्थना घेण्यात आली आहे. हा नवकार विश्वशांती मंत्र १०८ देशात एकाच वेळेस लाईव्ह टेलीकास्टच्या माध्यमातून विश्वात शांती एकता निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. हा नवकार महामंत्र का पठण केला जातो? त्याचे महत्व काय? हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या भाषणातून विस्तृतपणे स्पष्ट केले आहे जर रजीस्ट्रेशन द्वारे संख्या वाढली तर ९ एप्रिल हा दिवस नवकार दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत वासियांना विविध संकल्प करणे बाबतचे अवाहन करण्यात आले आहे यामध्ये पाणी वाचवा, एक झाड आईच्या नावाने लावा, स्वच्छता, संकल्प वोकल फॉर लोकल,संकल्प देवदर्शन, संकल्प नॅचरल फार्मिंगचा स्वीकार करणे, हेल्दी लाइफस्टाईल, योगा आणि खेळ हे जीवनात आणणे,गरिबांची मदत करणे असे संकल्प भारत वासियांना करणे बाबत सांगण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष श्री.गिरीषजी कुलकर्णी, सचिव श्री.जीवनजी जैन, सहसचिव श्री. संजयजी बडोला, खजिनदार श्री.जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन श्री.लालचंदजी केसवाणी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक तसेच शिक्षकेतर सर्वांच्या उपस्थित नवकार महामंत्र कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात पार पडला आहे.