पाचोरा येथे शिवसेना निर्धार मेळाव्यात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड;कार्यकर्ते संतोष महाजन व कन्हैया देवरे यांना पक्षाची जबाबदारी

पाचोरा, दि. 28 जून 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शिवसेनेने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली.
यावेळी पाचोरा माळी समाजाचे माजी अध्यक्ष श्री. संतोष भास्कर महाजन यांची शिवसेना पाचोरा तालुका उप तालुका प्रमुख म्हणून, तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहर अध्यक्ष श्री. कन्हैया हिरामण देवरे यांची पाचोरा शिवसेना शहर समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. ही निवड आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
या मेळाव्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला. आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटना बळकट करण्याचे आणि जनतेच्या हितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

