पाचोऱ्यात जयहिंद क्रिडा व लेझीम मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर यशस्वी

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथील हनुमान मंदिरात जयहिंद क्रिडा व लेझीम मंडळातर्फे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील २६ रक्तदात्यांनी रक्तगट तपासणी व रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून एक वर्षासाठी १ लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा, परिवारातील सदस्याला रक्ताची गरज भासल्यास सवलत, स्वत: रक्तदात्याला रक्ताची आवश्यकता असल्यास एक बॅग मोफत, तसेच कवीयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये २ गुणांची वाढ आणि प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जळगाव येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या पथकाने रक्त तपासणी व संकलन यशस्वीरित्या पार पाडले असून या उपक्रमाला कृष्णापुरी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतभाव मिळाला होता.