शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी पाचोऱ्याचे किशोर बारवकर

मधुर खान्देश वृत्तसेवा: शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी पाचोरा येथील माजी नगरसेवक किशोर बारवकर यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात आले. किशोर बारवकर यांनी पाचोऱ्यात तरुण वर्गाची फळी निर्माण करून तरुण कार्यकर्त्यांना घेऊन शिवसेनेच्या स्थापने पासून ते कार्य करत आहेत. ते प्रत्येक नागरिकांच्या संपर्कात, प्रत्येकाच्या सुखदुःखात कोणत्याही कामाच्यावेळी,कोणत्याही कार्यालयातील कामे असो, ते तत्परतेने व कुठलीही अपेक्षा न ठेवता धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून व आ. किशोर पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी नगरपालिकेचे सुकृत सदस्य नगरसेवक काम केले आहे. मागील वर्षी ते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख होते. त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल पुन्हा वरिष्ठांनी घेत त्यांची उपजिल्हाप्रमुखपदी फेर नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल श्री. बारवकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.