जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा: भुयारी मार्गात पावसामुळे रस्ता निसरडा, नगरसेवक विकास पाटलांचा किरकोळ अपघात!थोडक्यात बचावले
पाचोरा (मधुर खान्देश वृत्तसेवा), दि. १ जुलै २०२५: पाचोरा शहरातील भुयारी मार्गात सध्या पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने प्रवास करताना नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी आणि प्रवासी ये-जा करतात. मात्र, झिमझिम पावसामुळे रस्ता चिकणा झाल्याने गाड्या घसरण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याच मार्गावर नगरसेवक विकास पाटील यांचा गाडी घसरून अपघात घडला आहे.
या घटनेची तात्काळ माहिती विकास पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना दिली. मुख्याधिकारी देवरे यांनी त्वरित कार्यवाही करत भुयारी मार्ग स्वच्छ करण्यासाठी फायर फायटर पाठवण्याचे आदेश दिले. नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.