पाचोरा पीपल्स बँक निवडणूक: सहकार पॅनलच्या प्रचाराची नगरपालिका जिनमधील देवी मंदिरात नारळ फोडून सुरुवात

पाचोरा, 2 जुलै 2025 | पाचोरा येथील पीपल्स बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून, सहकार पॅनलने आपल्या प्रचाराचा शुभारंभ आज नगरपालिका जिनमधील देवी माता मंदिरात नारळ फोडून केला. जनरल गटातील 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात असून, सहकार पॅनलच्या प्रचारात सर्वपक्षीय नेते, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकील, डॉक्टर आणि सर्वधर्मीय नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी पाचोरा पीटीसी चेअरमन संजय नाना वाघ, युवा नेते सुमित किशोर आप्पा पाटील, व्हि टी नाना जोशी, नारायण पटवारी, दुष्यंत भाई रावल, भाईसाब अग्रवाल, माजी नगराध्यक्ष बापू सोनार, नंदू सोनार,दत्ता बोरसे पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन अतुल भाऊ संघवी, व्हाइस चेअरमन प्रशांत भाऊ अग्रवाल, संचालक मंडळ, माजी संचालक मंडळ तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी वर्ग, पत्रकार, वकील आणि डॉक्टर उपस्थित होते.
सहकार पॅनलने सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले असून प्रचारादरम्यान उपस्थितांनी एकजुटीने सहकार पॅनलच्या विजयासाठी कटिबद्ध असल्याचे दर्शवले.
पाचोरा पीपल्स बँकेच्या निवडणुकीसाठी सर्व स्तरातील नागरिकांनी सहकार पॅनलला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी करण्यात आले आहे.