जळगाव जिल्हाराष्ट्रीय
नागालँड राज्यातील नोकलाक जिल्ह्यास भेट देणाऱ्या श्रीमती रक्षाताई खडसे ह्या पहिल्या केंद्रीय मंत्री

म्यानमार देशाच्या सिमेस लागून असलेल्या नागालँड राज्यातील नोक्यान गावाला भेट देऊन येथील समृद्ध परंपरा अनुभवण्याची संधी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना मिळाली. येथे खिआमनियुंगन जमातीचा समृद्ध वारसा, सूक्ष्म हस्तकला आणि खोलवर रुजलेल्या परंपरांचे दर्शन यावेळी त्यांना घडले.

नागालँड येथील निसर्ग सौंदर्याच्या सान्निध्यात संस्कृती, वारसा आणि आत्मीय आतिथ्याचा अनोखा संगम असणारी समृद्ध परंपरा अनुभवण्याची संधी मिळाली, येथील स्थानिकांचे आतिथ्य पाहून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्यांना आनंद झाल्याबद्दल त्यांनी सांगितले. तसेच ही भेट शिकवणीची, जडणघडणीची आणि अविस्मरणीय क्षणांनी परिपूर्ण ठरली असे त्यांनी म्हटले. स्वातंत्र प्राप्ती व नागालँड राज्याच्या स्थापनेपासून सदर जिल्ह्यास भेट देणाऱ्या त्या पहिल्या केंद्रीय मंत्री आहे.

