महाराष्ट्र शासनाचे कॉपीमुक्त अभियान! सामनेरच्या महात्मा गांधी शाळेत पोलिसांच्या लेडी सिंघमने कॉपी पुरविणाऱ्यांना शिकवला धडा! तीन तास शुकशुकाट

● होमगार्ड सोनाली पाटील (देवरे) यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक.
राहुल महाजन, संपादक (मधुर खान्देश) | राज्यात सर्वत्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा सत्र सुरू असून यामध्ये जळगाव जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी पोलीस तसेच होमगार्ड बांधवांच्या वतीने अनेक शाळांच्या बाहेर कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा म्हणून काम केले जात आहे. यामध्ये विशेषतः जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सामनेरच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मागील वर्षी कॉपी पुरविण्यात येत असल्याबाबत बातम्या प्रसारित झाल्या होत्या. सदर विषय सर्वत्र राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता यामध्ये परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला होता आणि यावर संबंधित केंद्र चालकांवर कारवाई देखील करण्यात आली होती. यामध्ये जळगाव जिल्हा प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर बदनामी यामध्ये झाली होती. परंतु यंदाच्या वर्षी पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामनेरच्या या गावातील सेंटरवर बंदोबस्त म्हणून पोलीस तसेच होमगार्ड बांधव नियुक्त केले होते. यंदाही तसाच प्रकार परिसरातील काही टवाळखोर मुलांकडून सुरू होता. हा सगळा प्रकार सुरू असतांना महिला होमगार्ड सोनाली देवरे-पाटील यांच्याकडे बघून राग अनावर होईल असे कृत्य करत असतांना पोलिसांच्या निदर्शनास आल्याने याठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड बांधवांनी यांना चांगलाच धडा शिकवला आहे. परीक्षा सुरू असतांना परिसरात तब्बल तीन तास या ठिकाणी कुठलाही प्रकारचा कॉपी बहाद्दर थिरकला नाही. परिसरात एकच शुकशुकाट बघायला मिळाला आहे. टवाळखोरी करणाऱ्यांवर संबंधित महिला होमगार्ड यांच्या तक्रारीवरून सदर इसमांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. सदर पाचोरा येथील लेडीज सिंघम होमगार्ड सोनाली शशिकांत देवरे यांचे सामनेर येथील केंद्रप्रमुख त्याचबरोबर शिक्षण विभागाचे अधिकारी,पोलीस निरीक्षक अशोक पवार त्याच बरोबर जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने होमगार्डचे प्रमुख व होमगार्ड बांधवांच्या वतीने सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.