नवक्रांती युवक मंडळाच्या वतीने पोलीस विभागासह सेवा पुरवणाऱ्या सर्व विभागांचा सत्कार! आपल्या परिसरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा देखील सत्कार करावा:पोलीस उपनिरिक्षक प्रकाश चव्हाणके

● नवक्रांती मित्र मंडळाच्या वतीने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची सुरुवात करा! पुस्तके देण्याचे काम आमचे- सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व प्रकाश चव्हाणके यांची माहिती.
● राहुल महाजन,संपादक (मधुर खान्देश)
पाचोरा : दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी आठवडे बाजार बाहेरपुरा परिसरातील नवक्रांती युवक मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी! आयोजकांच्या वतीने पाचोरा पोलीस विभागाचे त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन,महावितरणचे कर्मचारी, शहरातील पत्रकार बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस दिनेश भदाणे यांची सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही परिसरातील नागरिकांसाठी देखाव्याच्या माध्यमातुन सादर केला अतिशय सूंदर होते. त्याच बरोबर पोलीस उपनिरीक्षक चव्हाणके साहेब यांनी मंडळाच्या उपस्थित सभासदांना, अध्यक्षांना तसेच परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन करत सुचित केले आहे की परिसरातील मिरवणूक अतिशय जल्लोषात झाली, बघून आम्हालाही आनंद झाला अतिशय शांततेत हा सगळा कार्यक्रम संपन्न झाल्यामुळे आम्ही देखील भारावून गेलो होतो महाकाल शिव अग्नी तांडवचे अतिशय सूंदर सादरीकरण होते. यापेक्षाही अधिक म्हणजे परिसरातील नागरिकांना अभिमान वाटेल असे देखील कर्तृत्व आपण करा. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचा सत्कार आपण या पुढील येणाऱ्या काळात करावा असे सुचित करत उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर पाचोरा शहरातील मधुर खान्देश चॅनेलचे संपादक पत्रकार राहुल महाजन यांनी देखील शिवराय नाचून नाहीतर वाचून डोक्यात घाला यासाठी प्रयत्न करा याबाबत मार्गदर्शन केले आहे. यावेळी नवक्रांती युवक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर पोलीस विभाग, गृहरक्षक दलाचे प्रमुख तसेच पत्रकार अनिल आबा येवले, पत्रकार राहुल महाजन जावेद शेख, राजेंद्र खैरनार आदींची उपस्थिती होती.