पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील एच.बी हायस्कूलला 1993 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम संपन्न!

राहुल महाजन,संपादक (मधुर खान्देश) | दि. 2 मार्च 2025 रोजी पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एच.बी.हायस्कुल येथे 1993 ला दहावीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गेट-टुगेदर चा कार्यक्रम आयोजित केला होता. जवळपास 32 वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर या शाळेत शिकणाऱ्या मुली व मुलांनी मिळून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये पाचोरा येथील संस्थेचे चेअरमन संजय वाघ तसेच पाचोरा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांची देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे साहेब यांनी हाती घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये सन 2020 मध्ये आलेला कोरोना सारखा गंभीर आजार आपल्याला सर्वांना खूप काही शिकवून गेला, आपल्याजवळची माणसं आपल्यासमोर निघून गेली कोण कधी हे जग सोडून जाईल हे कोणालाही माहिती नाही. खऱ्या अर्थाने कोरोनाच्या कालखंडामध्ये जी शिकवण समाजाला मिळाली त्यापासूनच मोठ्या प्रमाणावर जिवाभावाची माणसं एकमेकांना भेटण्यासाठी आपल्या गावी यायला सुरुवात झाली आणि तिथूनच गेट-टुगेदर ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर उदयास आली आहे. या कार्यक्रमात सर्वप्रथम 32 वर्षानंतर भेटलेल्या मित्र मैत्रिणी आपला परिचय करून दिला “आम्ही आधी काय होतो आणि आता काय आहोत” याचा परिचय सगळ्यांनी दिला यामध्ये अनेक वर्षानंतर भेटणाऱ्या मित्र मैत्रिणींचा आनंद गगनाला भिडणारा होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी मोलाचे मार्गदर्शन करत जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांची मने जिंकली आहेत. तर संस्थेचे चेअरमन संजय नाना यांनी देखील जळगाव येथील झालेल्या घटनेची आठवण करत आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात कसा जगता येईल आणि एकमेकांच्या सुख दुःखात कसे सामील होता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.या

आयोजक विद्यार्थी मंडळाकडून शाळेसाठी दहा फॅन गिफ्ट म्हणून देण्यात आले आहेत. वेळी शर्मा सर,देसले सर,आर.एम.पाटील सर,पी.एम जाधव,एस.ए.पाटील सर त्याच बरोबर आयोजक सुनील शिंदे,मनोज पाटील,ज्ञानेश्वर कुमावत, महेंद्र पाटील,अजय पाटील,रत्नाकर पाटील,प्रवीण पाटील,रघुनाथ सोनवणे त्याच बरोबर आदी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. शाळेचे मुख्याध्यापक कर्मचारी शिक्षक या ठिकाणी सहकार्य लाभले आहे.

यावेळी वृत्त संकलनासाठी आवर्जून मला उपस्थित राहण्याबाबत जवळपास सर्वच मंडळींनी आमंत्रण दिले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर पत्रकार म्हणून जो सन्मान मिळाला तो सन्मान नक्कीच फार आनंददायी होता…