पातोंडा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र जानराव बिनविरोध निवड!

चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी पातोंडा येथील वृक्षमित्र श्री राजेंद्र लक्ष्मण जानराव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच व्हाइस चेअरमन पदी समाज भूषण श्री विजय रघुनाथ माळी यांची निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी म्हणून सौ. भोईर मॅडम व सचिव मोहन सोनवणे यांनी कामकाज पाहिले. या निवडणूक प्रक्रियेत सौ. जिजाबाई सुभाष माळी, श्री सुधाकर बापूराव देशमुख, कौतिक जगन्नाथ माळी, श्रीमती सुमनबाई रामदास पाटील, विष्णू नामदेव रोकडे, संजय विठ्ठल अहिरे, सुभाष मांगो माळी, विश्वास रामदास माळी, कैलास नामदेव झगडे यांनी सहभाग नोंदवला बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी सभापती संजय भास्कर पाटील, लोकनियुक्त सरपंच काशिनाथ शिरसाठ, महारु परशराम पाटील, सोमनाथ महाहरू कोल्हे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
