नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

जळगांव: पाचोऱ्यातील कॉफी शॉपवर पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची कारवाई,एका विरुद्ध गुन्हा दाखल! पोलिसांची आता त्या लॉजवर नजर?


Advertisements
Ad 4

पाचोरा, दि. २५ मार्च २०२५: जळगांव जिल्ह्यातील पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील नवकार प्लाझा या शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या एका कॉफी शॉपवर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. या कॉफी शॉपचा संचालक भोई नामक इसमावर विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९ आणि १३१ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कॉफी शॉपकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे आढळून आले असून तपासणीत असे समोर आले की, या ठिकाणी कॉफी किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले गेले नव्हते. त्याऐवजी, कॉफी शॉपच्या नावाखाली आतमध्ये अंधाऱ्या खोल्या तयार करून पडद्यांनी विभागणी करण्यात आली होती. या खोल्यांमध्ये खुर्च्या ठेवून मुला-मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा संशय पोलिसांना आला. पाचोरा येथे जावुन सिल्वर पॉइंट नावाचे कॅफे मध्ये ११.३० वा. चे सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी कॉफी शॉप नावाचे दुकान दिसत असुन त्यामध्ये आत प्रवेश करता तो ८ बाय १५ लांबी रुंदीचा हॉल असुन तेथे एक काउंटर असुन कउंटरवर एक इसम बसलेला दिसला. त्यास त्याचे नाव, गाव विचारता त्याने बहिरम नगर, जळगांव चौफुली, पाचोरा, जि. जळगांव येथे राहत असल्याचे सांगीतले असून सदर इसमास गाळा हा कोणाचे मालकीचा आहे याबाबत विचारले असता त्याने सदरचा गाळा हा मी अजयसिंग राजपुत, रा. भडगांव, जि. जळगांव यांचेकडुन भाडेतत्वावर घेतला असल्याचे सांगीतले. सदर कॅफेची पाहणी करता ८ बाय १० लांबी रुंदीचे पडदयांचे एकुण ४ कर्पाटमेंट केलेले दिसत आहे. सदर कर्पाटमेंट मध्ये मुले व मुली अस्लिल चाळे करतांना दिसले. तेव्हा त्यांना त्यांचे नाव, गाव विचारुन त्यांना समज देवून सोडण्यात आले आहे. सदर कॉफी शॉप मधिल जागेची पाहणी करता तेथे ८ बाय ८ लांबी रुंदीचे पडदयांचे एकूण ४ कर्पाटमेंट बनविलेले आढळून आले. व आतमध्ये बसण्यासाठी छोटे लाकडी टेबल व प्लास्टीक खुर्चा व कपडयाचे पडदे हे दिसुन आले असून सदर इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलीस कर्मचारी राहुल शिंपी करीत आहेत.

या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून भोई याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास हाती घेतला असून, अशा बेकायदा व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्येही याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याकडून माहिती घेतली असता सदर ठिकाणी कारवाई करण्यात आली असून यानंतरही अशा प्रकारच्या संशयास्पद व्यवसायांवर लक्ष ठेवण्यासाठी पुढील काळातही अचानक तपासण्या करण्याचे नियोजन करण्यात आले आहे .


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button