मोठी बातमी….आकाशात मोठा आवाज! तालुक्याला भूकंप सदृश्य झटके?

● चाळीसगाव तालुक्यात भूकंप सदृश झटके! पाचोऱ्यात काय?
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भूकंप सदृश्य झटके लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आकाशात खूप मोठ्या प्रमाणात एक नव्हे तर दोन वेळा आवाज झाल्याने परिसरात एकच भयभीत वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते. सदर घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेतली असता प्रशासनाकडून आवाज आणि जमिनीला लागलेले झटके कशाचे होते याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
● त्याचबरोबर चाळीसगाव तालुक्यासह गिरणा पट्ट्यातील असलेले पाचोरा येथे देखील खिडकीच्या काचा हलल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिली आहे. याबाबत पाचोरा प्रांतधिकारी भूषण अहिरे यांना संपर्क केला असता याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती नसल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
● बांधकाम व्यावसायिक प्रदीप पाटील यांची प्रतिक्रिया…..याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतले असता पाचोरा शहरातील माजी नगरसेवक तथा बांधकाम व्यावसायिक प्रदीप पाटील यांनी देखील 5 वाजून 15 मिनिटांनी मोठा आवाज झाला खिडकी हालली हा झटका जाणवला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.