ताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील बहुळा धरणात महिलेची उडी! ओळख पटल्यास संपर्क साधा-9518774070

पाचोरा तालुक्यातील जळगाव पाचोरा हायवेवर असलेल्या बहुळा धरणात सकाळी 10 वाजेच्या सुमारास एका अज्ञात महिलेने उडी घेतली असता त्यामध्ये तात्काळ रस्त्यावरुन बांधकाम कामाला जाणाऱ्या हुसेन शहा चा पुतण्या वसीम शहा यांनी तात्काळ सदर महिलेचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले आहे येथे महसूल सेवक ईश्वर पाटिल तसेच वाहन चालक लाला पिंजारी,खेडगाव यांच्या मदतीने तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

या ठिकाणी तात्काळ गोराडखेडा येथील सरपंच मनोज आप्पा पाटील त्याचबरोबर वाहन चालक किशोर लोहार मनोज पाटील मधुर खान्देशचे संपादक राहुल महाजन या ठिकाणी उपस्थित होते.