जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील वेरूळी खु. येथील वणी गडावर पायी जाणाऱ्या बेपत्ता झालेल्या इसमाचा मृतदेह सापडला

पाचोरा येथील वेरूळी खु. येथील सचिन सोनवणे उर्फ पिकू हा युवक वणी गडावर जात असतांना काल भडगाव तालुक्यातील जामदा कालव्यात आंघोळीसाठी गेला असता त्याचा तोल गेल्याने तो पाटात पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. या अनुषंगाने बजाडगाव येथील तहसीलदार शीतल सोनाट यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरू केली होती यामध्ये स्थानिक ग्रामस्थ, पोलिस पाटील,पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नाने आज सचिन सोनवने याचा मृतदेह वळवाडी गावाच्या पाटचारीच्या मोरी जवळ आज दि.7 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह पाण्यातून काढून भडगाव ग्रामीण रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.