नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यातील चिंतामणी हाॅस्पिटलचे नविन वास्तु स्थलांतर सोहळा! अत्याधुनिक सुविधांसह रुग्णांच्या सेवेमध्ये सुरू…


पाचोरा शहरातील देशमुखवाडी परिसरात अनेक वर्षांपासून रुग्णांना रुग्ण सेवा देणारे डॉ विशाल पाटील यांच्या चिंतामणी हाॅस्पिटलच्या नविन भव्य वास्तु स्थलांतर सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

दिनांक 15 मार्च 2025 शनिवारी पासून अद्यावत हॉस्पिटलचे नविन ठिकाण सु.भा.पाटील विद्यामंदिर, देशमुख वाडी या शाळेच्या समोर असून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे बाबत डॉ. विशाल पाटील यांच्या वतीने अवाहन करण्यात आले आहे. सकाळी 10:00 वाजेपासुन आपल्या आगमनापर्यंत तरी आपण या कार्यक्रमात येऊन आम्हास उपकृत करावे.

या चिंतामणी हाॅस्पिटल च्या नवीन वास्तु चे उद्घाटन हे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. पाचोरा भडगाव चे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या शुभहस्ते मेडिकल चे उद्घाटन करण्यात येणार आहे तर आय.सी.यु. चे उद्घाटन हे निर्मल सीडस् पाचोरा चे संचालिका वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात येईल, भा.ज.पा.तालुकाध्यक्ष
अमोलभाऊ शिंदे यांच्या शुभहस्ते डॉ.कॅबीन चे उद्घाटन करण्यात येणार आहे. या नवीन वास्तु सोहळ्यास मा.उपप्राचार्य प्रा.श्री. सुरेश रंगराव सोनवणे(पाटील) यांच्या अर्धांगिनी सौ. विद्या सुरेश सोनवणे, मा.उपप्राचार्य प्रा.मा.श्री. यशवंतराव सुपडू पवार ,सौ. शोभा यशवंतराव पवार यांच्या शुभ आशिर्वाद लाभणार आहेत. डॉ भुषण मगर (विघ्नहर्ता हॉस्पिटल) पाचोरा डॉ. असोसिएशन सन्माननिय मित्र परिवार,डॉ. नरेश गवांदे (श्रीनिवास हॉस्पिटल) तसेच सन्माननिय सर्व पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी या उदघाटन सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.

● श्री. प्रशांत सुरेश पाटील Asst. Vice President Axis Bank,सौ. स्मिता प्रशांत पाटील M.Sc.,डॉ. विशाल सुरेश पाटील M.D. Physician,सौ. डॉ. प्रियंका विशाल पाटील B.A.M.S.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button