जळगाव जिल्हाराज्य
जळगाव जिल्हापरिषद नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मिनल करनवाल!

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकीत यांची संभाजीनगर जिल्ह्यात बदली तर नवीन जळगावचे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून 2019 IAS बॅचच्या मिनल करणवाल नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी त्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, नंदुरबार तर प्रशिक्षणकाल पूर्ण, भंडारा जिल्हा येथे कार्यकाळ पूर्ण केला आहे. मिनल करणवाल ह्या उत्तराखंड राज्यातील देहरादून जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्याचे शिक्षण हर दिल्ली येथे झाल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रमुख युवराज पाटील यांनी दिली आहे.