नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
ताज्या बातम्याराज्य

ब्रेकिंग : महाराष्ट्रात 20 मार्चला विविध जिल्ह्यांमध्ये दारू विक्री बंद आंदोलन! शासनाचा कोट्यावधी रुपयांचा टॅक्स बुडणार.


Advertisements
Ad 4

जळगाव: महाराष्ट्र राज्यामध्ये मद्याच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणावर टॅक्स मिळत असून दिवसेंदिवस या व्हॅट टॅक्समध्ये विविध धोरणात्मक बदल होऊन मद्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर मोठे संकट आले आहे. उद्या दिनांक 20 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र सरकारच्या व्हॅट टॅक्स धोरणाचा जाहीर निषेध म्हणून परमिट रूम बियर बार मधील मध्ये विक्रीवर महाराष्ट्र शासनाने व्हॅटच्या नावाखाली लादलेला 10 टक्के टर्न ओवर टॅक्स आणि प्रत्येक वर्षी वाढ होणारी परवाना नूतनीकरण फी रद्द करणे बाबत तसेच मध्य विक्रीतून शासनाचा महसूल वाढवण्यासाठी मद्य निर्मितीवर Fisr Point Tax करण्याचा आग्रही मागणीसाठी एक दिवसीय मद्य विक्री बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे खाद्य पेय विक्रेता मालक चालक असोसिएशन, फेडरेशन ऑफ हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य तसेच इतर सांगली, सातारा, जळगाव, नांदेड,कोल्हापूर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी या बंदमध्ये उडी घेत एक दिवशीय मद्य विक्री बंद करणे बाबत आंदोलन करण्याची योजिले आहे. या बंदमुळे महाराष्ट्र शासनाला मिळणारा कोट्यावधी रुपयाचा टॅक्स बुडणार असल्याचे देखील वर्तवले जात आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button