जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा पोलिसांच्या वतीने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च संपन्न!

पाचोरा येथे आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी पाचोरा पोलिसांच्या वतीने सण-उस्तवाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये रूट मार्च संपन्न झाला आहे. यामध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या ईद त्याचबरोबर गुढीपाडवा या हिंदू मुस्लिम बांधवांच्या सन निमित्ताने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा या अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च संपन्न झाला आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक अशोक पवार,पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी,योगेश गणगे तसेच दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड,पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचा समावेश होता.