जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावात कृषीविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन!

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी पाचोरा तालुक्यातील खेडेगाव नंदीचे गावामध्ये सायंकाळी 6:30 सुमारास कृषी विभागांतर्गत विविध कृषी विभागाच्या योजना व तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी पाचोरा येथील कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी किशोर मांडगे त्याचबरोबर रमेश जाधव व मंडळ कृषी अधिकारी यु आर जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या कृषी विभागाच्या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित द्यावी असे अवाहन कृषी विभागाचे अधिकारी जाधव त्याच बरोबर कृषी सहाय्यक रवींद्र पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
