कृषी उत्पन्न बाजार समिती विरुद्धच्या तक्रारी मागे घेणार! ऍड.अभय पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

पाचोरा बाजार समितीचे माजी सदस्य यांनी निवडणुकीच्या काळात वकील अभय पाटील यांना शब्द दिला होता की, आम्ही वैशाली ताई सूर्यवंशी यांना विधानसभा निवडणुकीत मदत करणार व तुम्ही आम्हाला शब्द द्या निवडणुकीनंतर आमच्यावर कोर्टात केलेल्या केसेस तुम्ही माघार घेणार असा शब्द दिला होता. त्या शब्दाला ऍडव्होकेट श्री अभय पाटील यांनी दिलेल्या शब्दाला व आश्वासनाला त्यांनी आज आपला शब्द खरा ठरविला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले मी दिलेला शब्द असून मार्केट कमिटीचे माझी काही संचालक यांच्यावरील सर्व केसेस उद्या दि.२२ मार्चला लोकन्यायालयात माघार घेत असून मी दिलेल्या शब्द पाळतो व माझी माघार घेत असून कुठलीही तडजोड न करता कुठल्याही आमिषाला बळी न पडता फक्त दिलेल्या शब्द पाळत आहे. राजकारण समाजकारण यामध्ये अंतर न ठेवता समान दृष्टिकोन ठेवून मी माझी माघार घेत आहे. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आजचा शत्रू कालचा मित्र असू शकतो याचे उदाहरण म्हणजे श्री अभय पाटील.