पाचोऱ्यातील जयकीरण प्रभाजी शाळेत विद्यार्थ्यांना भूगोल अभ्यासक्रमातील फिल्ड व्हिजीट उपक्रमा अंतर्गत प्रशासनाच्यावतीने माहिती

पाचोरा येथील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील वर्ग 8 वीच्या विद्यार्थ्यांना शालेय भूगोल या अभ्यासक्रमात दिलेल्या फिल्ड व्हीजीट या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाची निवडणूक यंत्रणा तसेच त्याची कार्यपद्धती या संदर्भात तहसीलदार विजय बनसोडे यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांनी निवडणूकीच्या कार्यप्रणाली बद्दल माहिती जाणून घेतली. विजय बनसोडे यांनी मतदान यंत्रणा कशी काम करते लोकशाही म्हणजे काय? लोकसभा तसेच विधानसभा काय असते राज्याचा प्रमुख कोण असतो स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणूक प्रक्रिया कशी असते. मतदार संघ कसा असतो कसा तयार केला जातो भारतात खासदार आमदार यांची निवड प्रक्रिया कशी असते, लोकशाही पद्धत भारतात कशी अस्तित्वात आली. याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली तसेच निवडणूक नायब तहसीलदार रणजीत पाटील तसेच संगणक तज्ञ श्री जयंत जाधव यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया व तहसीलमध्ये होणाऱ्या कामकाजाची माहिती सांगितली व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले आहे. या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेशजी बोथरा,उपाध्यक्ष श्री गिरीषजी कुलकर्णी, सचिव श्री जिवनजी जैन, सहसचिव श्री संजयजी बडोला, खजिनदार श्री जगदीशजी खिलोशिया,स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंदजी केसवानी,स्कूल कमिटी सचिव श्री. रितेशजी ललवाणी,संचालक श्री संजयजी चोरडिया,श्री गुलाबजी राठोड,श्री प्रभूलालजी शर्मा,श्री गोपाल जी पटवारी,सौ प्रीतीजी जैन,श्री महेंद्रकुमारजी हिरण,श्री अशोककुमारजी मोर,श्री शेखरकुमारजी धाडीवाल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील शाळेचे सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील,प्रतिभा मोरे,रूपाली जाधव,प्रीती शर्मा,शितल तिवारी,दीपिका रणदिवे,योगिता शेंडे,पूजा पाटील,ज्योती बडगुजर,कविता जोशी,रूपाली देवरे,भाग्यश्री ब्राह्मणकर,विद्या थेपडे,पिंकी जैन,शितल महाजन,स्मिता देशमुख,हरिप्रिया नम्र,किशोरी साळुंखे,पुनम कुमावत,शालिनी महाजन,संगीता पाटकरी,पूजा अहिरे,कल्पना बोरसे,वाल्मीक शिंदे,निवृत्ती तांदळे,संजय सोनजे,संदीप परदेशी,कृष्णा शिरसाठ,आनंद दायमा,मनोज बडगुजर,शिवाजी ब्राह्मणे,शिवाजी पाटील,अलका बडगुजर,अश्विनी पाटील,सुनिता शिंपी,मनीषा पाटील,विकास मोरे यांचे सहकार्य लाभले. इयत्ता 8 वीचे वर्गशिक्षक किरण बोरसे सर यांच्या संकल्पनेतून अभ्यासक्रमातील हा उपक्रम तहसील कार्यालय पाचोरा येथे यशस्वीरित्या संपन्न झाला आहे.