पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने ईद निमित्ताने इफ्तार पार्टी संपन्न! सामजिक एकतेचा दिला संदेश

आज दिनांक 22 मार्च 2025 रोजी पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने ईद निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून पाचोरा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे त्याचबरोबर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार तसेच पाचोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अजहर खान व पाचोरा शहरातील हिंदू-मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित होते.




या ठिकाणी रमजान महिन्याचा उपवास असताना देखील एका हिंदू महिलेने बहुळा नदी मध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशावेळी त्या ठिकाणाहून प्रवास करत असलेल्या वाशिम शहा या मुस्लिम बांधवांनी जीवाची परवा न करता पाण्यात उडी मारून सदर महिलेचा प्राण वाचवला होता त्या अनुषंगाने उत्कृष्ट कार्य केल्याबाबत पाचोरा येथील पोलिसांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे

पाचोरा शहर हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक समजले जाते. यामध्ये विशेषतः गुण्या गोविंदाने राहणाऱ्या हिंदू मुस्लिम बांधवांना उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या वतीने शुभेच्छा देत आपल्या गावात शांतता अबाधित राहावी याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर पाचोरा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

तर पाचोरा येथील जेष्ठ पत्रकार प्राध्यापक सीएन चौधरी यांच्या वतीने देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे.
