नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदी दिनेश चौधरी यांची निवड!


Advertisements
Ad 4

लोहारा :ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्रच्या प्रसिद्धी प्रमुख पदावर लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार श्री दिनेश सोनजी चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांचे समाजातील योगदान आणि सातत्याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री भटू पुंडलिक नेरकर चौधरी यांनी त्यांची निवड केली.

या निवडीबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख श्री अजय अशोक चौधरी (जामनेर).भटू पुंडलिक नेरकर, जेष्ठ पत्रकार महेंद्र शेळके, सुधाकर चौधरी(मेणगाव ),लोहारा येथील तेली समाज अध्यक्ष, समाज बांधव,तसेंच अनेक पत्रकार बांधवांनी दिनेश चौधरी यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दिनेश चौधरी यांच्या नेतृत्वामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button