नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्यात कृष्णापुरीचे नावलौकिक! राजेश पाटील विद्यार्थ्यांचा बुडो मार्शल आर्ट स्पर्धेत दुसरा क्रमांक


Advertisements
Ad 4

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील कृष्णापुरीतील रहिवासी असलेले पोलीस कर्मचारी दिपक पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील यांनी बुडो मार्शल आर्ट या स्पर्धेत राज्यातून दुसरा क्रमांक पटकावून कृष्णापुरीचे नाव लौकिक केले आहे.

पाचोरा येथील नि.द. तावरे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी राजेश दिपक पाटील याने चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय राज्यस्तरिय बुडी मार्शल आर्ट स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचे विविध स्तरातून कौतुककरण्यात येत आहे. सदर विद्यार्थी सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन चा खेळाडू असून त्याला श्री. प्रविण मोरे,प्रकाश निकुंभ,निलेश सोनवणे तसेच जळगाव जिल्हा कराटे डू असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राजेश पाटील हा सेवानिवृत्त जिल्हा परिषदेचे अधिक्षक श्री. पितांबर शामराव पाटील ह.मु. विकास कॉलोनी पाचोरा यांचा जातू तसेच श्री. दिपक पितांबर पाटील पोलीस कर्मचारी सध्या नियुक्ती पिंपळगाव हरेश्वर येथे असून यांचा चिरंजीव आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button