जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा येथे पत्रकार राहुल महाजन यांच्या साप्ताहिक मधूर खान्देश वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न! अनेक मान्यवरांचे उपस्थिती

पाचोरा शहरातील नवीन व्यापारी भवन येथे पाचोरा येथील पत्रकार राहुल महाजन यांच्या नव्याने सुरू झालेल्या साप्ताहिक मधुर खान्देश या वृत्तपत्राला नवीन सुधारित वृत्तपत्र नोंदणी कायद्यानुसार अधिकृतपणे नोंदणी मिळाली असून या वृत्तपत्राचा प्रथम अंक प्रकाशन सोहळा पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील त्याचबरोबर विभागाचे प्रांत अधिकारी भूषण अहिरे,तहसीलदार विजय बनसोडे,पोलीस निरीक्षक अशोक पवार, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव त्याचबरोबर भाजपचे नेते मधुभाऊ काटे व ओबीसी नेते अनिल महाजन अशांसह शहरातील तमाम सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर वकील त्याचबरोबर पत्रकार पोलीस बांधवांच्या उपस्थितांच्या साक्षीने संपन्न प्रथम वर्धापन दिन व प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे






























