पाचोऱ्यात युवासेना-शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांच्या वतीने मोफत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन!

युवासेना शिवसेना तर्फे मोफत सीईटी सराव परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी सौ. वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या यांच्या माध्यमातून पाचोरा व भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी 29 मार्च 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
दि. 29 मार्च 2025 (शनिवार) रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने पाचोरा शहरात तात्यासाहेब आर.ओ. पाटील नगर, पुनगाव रोड येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल (पूर्व प्राथमिक विभाग) येथे आयोजित करण्यात येणार आहे. युवासेना-शिवसेना तर्फे मोफत सीईटी परीक्षेचे निःशुल्क पद्धतीने आयोजन करण्यात आले असून सदर सराव परीक्षा अभियांत्रिकी, वैद्यकीय,विधी व फार्मसी शाखांच्या कॉमन एंट्रन्स टेस्ट (CET) साठी उपयुक्त ठरणार आहे. सलग सहाव्या वर्षी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेतली जात आहे. विनामूल्य नाव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी https://yuvasenacet.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची Online Registration प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असून सदर सराव परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा तसेच आपल्या नातेवाईक व मित्रांना सुद्धा याविषयी माहिती द्यावी असे आवाहन शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी केले आहे.