अजब दोस्ती की गजब कहानी…. मुस्लिम मित्रासाठी पकडला हिंदू मित्राने रोजा….मै हु संजुबाबा….

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा जवळ असलेल्या नेरी गावामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने उपवास केले जातात त्याला वैज्ञानिक कारण आहे असे देखील अनेकांनी वर्तविले आहे. मुस्लिम बांधव उपासाच्या माध्यमातून परमेश्वराला प्रार्थना करत असतात.
अशीच एक “अजब दोस्ती की गजब कहानी” ती म्हणजे नेरी येथील अन्वर तडवी नामक हा मजुराचे काम करणारा युवक असून त्याच्यासोबत महावितरण कर्मचारी असलेले संजय नामदेव पाटील उर्फ (संजूबाबा) राहणार नेरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव हे देखील मागील 10 वर्षांपासून सोबत काम करतात. आपला अंग मेहनतीचे काम करणारा मुस्लिम मित्र उपवास करतो हीच प्रेरणा घेऊन मी देखील उपवास पकडून तुझ्या सोबत काम करणार असे सांगून त्या दिवसापासून संजू बाबा यांनी उपवास पकडायला सुरुवात केली आहे. त्या दिवसापासून ते आज पर्यंत प्रत्येक रमजान महिन्यांमध्ये शक्य तेवढे उपवास ठेवण्याचा ते प्रयत्न करतात व रमजान महिन्यामध्ये मज्जिद मध्ये जाऊन उपवास सोडण्याचे काम करतात. यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा सामाजिक संदेश देण्याचा या ठिकाणी या संजूबाबाचा माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. सदर संजूबाबाची माहिती नगरदेवळा येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांना मिळाली असता त्यांनीदेखील त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.