नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

रमजान विशेष: पोलिस कर्मचारी वसीम शेख यांचे पूर्ण उपवास ऑन ड्युटी २४ तास!


Advertisements
Ad 4

जळगाव: सध्या सर्वत्र मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असून आठवडाभरात आता ईद मुस्लिम बांधव साजरी करणार आहे. यामध्ये तब्बल महिनाभर मुस्लिम बांधवांच्या वतीने उपवास ठेवले जातात पवित्र अशा रमजान महिन्यात विविध कार्यक्रम,सामाजिक उपक्रम केले जात असून यामध्ये पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विशेषतः मुस्लिम समाजाचे  शांत,संयमी, मनमिळावू स्वभावाचे असलेले पोलीस कर्मचारी वसीम शेख यांनी देखील संपूर्ण दिवस उपवास आतापर्यंत ठेवले असून उपवास असतांना देखील चोखपणे ऑन ड्युटी २४ तास ड्युटी केली आहे. या निमित्ताने वसीम शेख त्याचबरोबर पोलीस कर्मचारी शकील शेख यांच्या सुपुत्र व पोलीस बॉईज असोसिएशनचे पदाधिकारी नदीम शेख यांनी देखील संपूर्ण उपवास आता पर्यंत ठेवले असून यांना इफ्तार पार्टीमध्ये बोलून त्यांना शुभेच्छा देण्यात आले आहेत. यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे,सुनील पाटील,तसेच पोलीस कर्मचारी विश्वास देशमुख,योगेश पाटील,तुषार विसपुते, उमाळे दादा त्याच बरोबर दिव्य मराठीचे प्रतिनिधी नंदू शेलकर,मधुर खानदेशचे संपादक राहुल महाजन,इरफान मणियार व नदीम शेख उपस्थित होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button