कन्नड घाटात संशयास्पद खुनाचा उलगडा; तीन आरोपींना अटक! चाळीसगाव ग्रामीण तसेच जळगाव एल.सी.बी ची संयुक्त कारवाई

चाळीसगांव, दि. २९ जून २०२५: कन्नड घाटात २९ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचे संशयास्पदरित्या खून झालेले प्रेत आढळले होते. चाळीसगांव ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मयताची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, कारण प्रेताजवळ ओळखीचा कोणताही पुरावा नव्हता.
पोलिसांनी मयताच्या अंगावरील वस्तू आणि गोंदलेल्या निशाण्यांची तपास यादी तयार करून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. यानंतर मयताची ओळख जगदीश जुलाल ठाकरे (रा. मोरदड, ता. जि. धुळे) अशी झाली. धुळे तालुका पोलीस स्टेशनला त्याच्या गैरहजेरीची नोंद होती.
मयताच्या पत्नी अरुणा जगदीश ठाकरे यांनी चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन खळबळजनक खुलासा केला. त्यांनी आरोप केला की, राजकीय वैमनस्यातून मोरदड गावातील शुभम सावंत, अशोक मराठे आणि एका अनोळखी तरुणाने मिळून जगदीश यांना वाढदिवसाच्या बहाण्याने घरातून बाहेर नेले आणि त्यांचा खून करून मृतदेह कन्नड घाटात टाकला. यावरून पोलिसांनी बीएनएस कलम १०३(१) आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल






