नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

भडगाव:लोकन्यायालयात वादपूर्व, प्रलंबित प्रकरणांसह 63 प्रकरणांचा निपटारा! लाखोंची वसुली


Advertisements
Ad 4

प्रतिनिधी(भडगाव) दिवाणी व फौजदारी न्यायालय भडगाव जिल्हा जळगाव येथे दि.22 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे निर्देशाप्रमाणे तालुका विधि सेवा समिती भडगाव व वकील संघ भडगाव यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सदर लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवण्याकरिता ठेवण्यात आलेली होती. सदर लोकन्यायालयात प्रलंबित प्रकरणे 28 व वादपूर्व प्रकरणे 35 असे एकूण 63 प्रकरणे निकाली काढण्यात आली व सदर प्रकरणात रक्कम रु. 4401131.00 चौरेचाळीस लाख एकशे एकतीस रकमेची तडजोड करण्यात आली. व लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती.व्ही.एस.मोरे, दिवाणी न्यायाधीश क स्तर भडगाव, प्रा. वि.राजळे सह दिवाणी न्यायाधीश व पॅनल सदस्य म्हणून ऍड. व्ही आर महाजन यांनी कामकाज पाहिले. सदर लोक न्यायालयात भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बी. आर. पाटील ,उपाध्यक्ष ॲड.बी.टी. अहिरे,सचिव ॲड.बी. आर. ठाकरे, ॲड.आर. के. वाणी, ॲड.के.टी. पाटील, ॲड.पी.के. जयस्वाल, ॲड. ए.डी. बाग, ॲड पी.बी. तिवारी, ॲड एन. जे.तिवारी, ॲड .एम. बी. पाटील, ॲड.एस. आर.सोनवणे, सरकारी अभियोक्ता आय. ए. रंगरेज, पीएसआय रमण कंडारे, सर्व विधीज्ञ पक्षकार तसेच मा. तालुका विधी सेवा समिती भडगाव येथील सहाय्यक अधीक्षक बी.
ए.बारी विधी सेवा समिती भडगाव येथील वरिष्ठ लिपिक एस. एस. रानडे, एन. एम.पाटील, दीपक पाटील, रमेश चव्हाण, अभिजीत दायमा, होतीलाल पाटील, अनिल गोधने, संदीप परदेशी, प्रकाश सोनवणे, जगदीश वाडीले, नितीन कदम, न्यायालयीन कर्मचारी व बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत नगरपालिका यांचे कर्मचारी देखील उपस्थित होते. वरील सर्व उपस्थितानी सदर लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button