नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

पाचोऱ्यातील अनिल सावंत होणार कोहिनुर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित


Advertisements
Ad 4

नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महत्वाचा कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत यांना जाहीर झाला असून सदरचा पुरस्कार हा विविध मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथे विशाखा हॉल,कुसुमाग्रज प्रतिष्ठान,गंगापूर रोड,नाशिक येथे दिनांक ०४ मे २०२५ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत सर हे गेले अनेक दशकापासून चर्मकार समाजात उल्लेखनीय कार्य करत असतात ते आज विविध संघटनेत देखील काम करत असून त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, तसेच पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजेच एक मानाचा तुरा समाजात रोवला गेला असून ते आज विविध क्षेत्रातील सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मालन वसतिगृह पाचोरा येथे अधीक्षकपदावर तसेच सहकार क्षेत्रात संचालक म्हणून दादासाहेब गजमल को-ऑप बँकेत अनेक वर्षे होते व पत्रकारिता मध्ये अनेक वृत्तपत्र मध्ये काम करून झटपट लाईव्ह न्यूज च्या माध्यमातून संपादक म्हणून परिचित असून ग्रामपंचायत मध्ये माजी सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, तसेच पत्रकार, व सहकार क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button