पाचोऱ्यात रविवारी भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

पाचोरा, दि. १२ एप्रिल: येत्या रविवारी, १३ एप्रिल रोजी पाचोरा पोलीस बाईज यांच्या वतीने श्रीनिवास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर, भडगाव रोड, पाचोरा येथे भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात सर्व नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची संधी उपलब्ध असेल. पाचोरा येथील नागरिकांनी या शिबिरात उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पाचोरा पोलीस बाईज यांनी केले आहे.
या शिबिरात रक्तदानाची सुविधा देखील उपलब्ध असेल. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून गरजूंना मदत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पाचोरा पोलीस बाईज यांच्याशी संपर्क साधावा. या शिबिराचे आयोजन श्रीनिवास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भडगाव रोड, पाचोरा येथे पाचोरा पोलीस बाईज असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे.