नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात!


Advertisements
Ad 4

जळगाव, दि. १७ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – मौजे बोरअजंटी (ता. चोपडा) येथे राखीव वनकक्ष क्र. २३६ च्या हद्दीत वनविभाग व पोलीस दलाच्या संयुक्त गस्तीदरम्यान २ जणांकडून काळवीटाचे शिंगे व शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १७ जुलै रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर, वनपाल बोरअजंटी, परिमंडळ व रेंज स्टाफ तसेच पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांच्या संयुक्त नाकाबंदी दरम्यान, स्प्लेंडर प्लस (MP-10/NC-4857) मोटरसायकलवरील दोन व्यक्तींना अडवून तपासणी केली असता पिवळ्या गोणीत काळवीटाचे २ शिंगे व सुमारे २ कि. ग्रॅ शिजवलेले मांस आढळून आले. सदर दोन्ही इसम ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –

वांग्या पुसल्या बारेला (वय ४८, रा. टाक्यापाणी, ता. वरला, जि. बडवाणी, ह.मु. बोरखेडा, ता. धरणगाव)

धुरसिंग वलका बारेला (वय ४५, रा. वरुड, जि. खरगोन, ह.मु. पळासखेडा)

तपासा दरम्यान त्यांनी काळवीटाची शिकार केल्याची कबुली दिली. याप्रकरणी प्र.रि.क्र. ०३/२०२५ अन्वये गुन्हा नोंदवून काळवीटाचे शिंगे, मांस, मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वनपरिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे यांनी सांगितले की, “वन्यजीव शिकार करणे, त्यांचा अधिवास धोक्यात आणणे हे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९ व ५१ चे उल्लंघन असून, सदर गुन्हा अजामीनपात्र व दखलपात्र स्वरूपाचा आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ७ वर्षांपर्यंत कारावास आणि २५,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.”

सदर कारवाई मा. वनसंरक्षक (प्रा.) धुळे, उपवनसंरक्षक यावल, विभागीय वनअधिकारी (दक्षता) धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (चोपडा), वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर, पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण व त्यांच्या पथकांनी केली.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button