संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने किर्तन सप्ताह आणि पालखी सोहळ्याचे आयोजन!

मधुर खान्देश वृत्तसेवा |दिनांक 16 जुलै 2025 पासून सुरू झालेला संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने किर्तन सप्ताह येत्या 23 जुलै 2025 रोजी संपन्न होणार आहे. या आठवडाभर चालणाऱ्या किर्तन सोहळ्यात दररोज विविध संत-महंतांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी ह.भ.प. श्री विकास महाराज खर्देकर, दुसऱ्या दिवशी ह.भ.प. श्री गोपाल महाराज ऊंदिरखेडेकर, तिसऱ्या दिवशी ह.भ.प. श्री दिपक महाराज रडावंण, चौथ्या दिवशी ह.भ. सौ. संध्याताई महाराज माळी (सुरत), पाचव्या दिवशी ह.भ.प. सौ. वैशालीताई महाराज (चाळीसगाव), सहाव्या दिवशी ह.भ.प. सावता महाराज मोहाडी, सातव्या दिवशी ह.भ.प. योगेश महाराज धामणगाव आणि आठव्या दिवशी काल्याचे किर्तन ह.भ.प. गोविंद महाराज केकत निंभोरा यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा समारोप 23 जुलै 2025 रोजी सकाळी 8 वाजता सावता महाराज मंदिर येथून निघणाऱ्या भव्य पालखी सोहळ्याने होणार आहे. पालखी कोंडवा गल्ली, जुन्या विठ्ठल मंदिर, देशमुख वाडी, बाहेरपुरा, कृष्णापुरी मार्गे नवीन विठ्ठल मंदिर येथे पोहोचेल. दुपारी 12 नंतर नवीन विठ्ठल मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना या किर्तन सप्ताह आणि पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष करण्यात येत आहे.