पाचोरा येथील श्री. गो.से. हायस्कूलमध्ये गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे 23 जुलै 2025 रोजी गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन संजय वाघ, सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्नील पाटील,व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी, ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, मयूर सराफ, योगेश जडे, डॉ. रुपेश पाटील, डॉ. नरेश गवांदे, तसेच विजय कापड दुकानाचे संचालक अनुराग भारतीया, नेरी वाला ड्रेसेसचे रवी अग्रवाल, दर्शन एम्पोरियमचे ओम राठी, पी.सी. जैनचे विजयकुमार बडोला, शाळेचे मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे, उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ. ए.आर. गोहिल,आर.बी. तडवी,आर.बी. बांठीया, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन. पाटील, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांच्यासह पालक, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर शाळेतील सुमारे 200 अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. गणवेशासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आर.बी. बोरसे यांनी केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शाळेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला.