पाचोऱ्याचे वैभव स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांना संगीतमय श्रद्धांजली

पाचोरा: निर्मल सिड्स प्रा. लि. चे संस्थापक, माजी आमदार आणि कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीचे नेतृत्व स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित “संगीतमय पुष्पांजली” हा कार्यक्रम मोठ्या श्रद्धाभावाने संपन्न झाला. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगभूत संघटनांच्या वतीने निर्मल सिड्स प्रा. लि., पाचोरा येथे हा कार्यक्रम पार पडला.
तात्यासाहेबांनी केवळ राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात मोठे योगदान दिले. 1988 मध्ये त्यांनी निर्मल सिड्सची स्थापना करून भारतीय शेतकऱ्यांसाठी उच्च उत्पादनक्षम आणि ताणसहिष्णु वाण विकसित करण्यावर भर दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे निर्मल सिड्स आज भारतभर २३ राज्यांमध्ये आपला ठसा उमटवणारी एक अग्रगण्य कृषी संस्था बनली आहे.
तात्यासाहेबांचे योगदान आणि स्मरण
कार्यक्रमात मान्यवरांनी तात्यासाहेबांच्या समाजकार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. “तात्यासाहेबांनी केवळ आमदार म्हणून नव्हे, तर एक समाजसेवक म्हणून शेती आणि ग्रामीण विकासासाठी आयुष्य वेचले. त्यांचे कार्य पुढे नेणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे विचार शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
यावेळी संगीताच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेषतः पारंपरिक भजन, अभंग, तसेच तात्यासाहेबांच्या आवडीच्या गाण्यांनी वातावरण अधिक भावनिक झाले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती: शिवसेना नेत्या: सौ. वैशाली सुर्यवंशी निर्मल सिड्स संचालक: डॉ. एस. एस. पाटील, डी. आर. देशमुख, डॉ. जे. सी. राजपूत
निर्मल सिड्स जी. एम.: श्री. एस. एस. पाटील, पी. ए. दळवी, आय. एस. हलकुंडे, श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी कमलताई पाटील, याशिवाय, गणेश देवरे, योजना ताई पाटील, उद्धव भाऊ मराठे, रमेश बाफनाजी, गुलाब पाटील, राजू भाऊ काळे, जे. के. पाटील, सिकंदर तडवी, ऍड. अभय पाटील, ऍड. प्रविण पाटील, डॉ. गोरख महाजन, डॉ. भरत पाटील, सुधाकर वाघ, एकनाथ महाराज, गजू पाटील, बाळू तात्या, दिपक पाटील, सचिन भाऊ सोमवंशी गणेश अण्णा परदेशी
मनोहर चौधरी चेतन राजपूत, शरद पाटील, दिपक राजपूत, शशिकांत येवले, पप्पू दादा पाटील, राजेंद्र मोरे, हिलाल मेंबर, अरुण तांबे, डी. डी. पाटील सर, पंढरी आण्णा पाटील यांचीही या कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती.