पाचोऱ्यात झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू! झोपेतच हृदयविकाराचा धक्याच्या प्रमाणात वाढ

पाचोरा : धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, पाचोरा शहरातील त्र्यंबक नगर येथे ५७ वर्षीय सुरेश दगडू जाधव यांचा झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, त्र्यंबक नगर येथील रहिवासी असलेले सुरेश जाधव हे २५ जुलै रोजी दुपारी झोपेत होते. सायंकाळी सुमारे सहा वाजता त्यांचे कुटुंबीय बाहेरून घरी परतले. मुलगा आदेश याने त्यांना चहासाठी उठवण्याचा प्रयत्न केला असता, ते हालचाल करत नसल्याचे आढळले. तपासणीअंती त्यांचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
स्वर्गीय जाधव यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. मेडिकल क्षेत्रात कार्यरत असलेले मुन्ना शिंदे यांचे ते सासरे होते. त्यांची अंत्ययात्रा आज, २६ जुलै रोजी त्र्यंबक नगर, कृष्णापुरी येथून निघणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तणावपूर्ण जीवनशैली आणि हृदयविकाराच्या वाढत्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.