पाचोरा:गोराडखेडा खुर्द येथे श्रीराम कॉलनी ते बजरंग बली चौक रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व पेवर ब्लॉकचे काम पूर्ण

गोराडखेडा खुर्द, ता. पाचोरा: गोराडखेडा खुर्द येथील श्रीराम कॉलनी ते बजरंग बली चौक या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण आणि पेवर ब्लॉक टाकण्याचे काम जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या निधीतून यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे गावकऱ्यांना सुसज्ज आणि टिकाऊ रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली असून, स्थानिकांच्या दैनंदिन प्रवासात सुधारणा होणार आहे. या विकासकामात ग्रामपंचायतीच्या सरपंच मनोज (आप्पा) उत्तमराव पाटील आणि उपसरपंच धर्मराज दोधा पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले. ग्रामपंचायत सदस्य रविंद्र विक्रम पाटील आणि ज्ञानेश्वर वेडू पाटील यांनीही या कामाला सक्रिय पाठिंबा दिला. ग्रामस्थ बंटी ज्ञानेश्वर पाटील, रोहीत दादाभाऊ पाटील, सागर पाटील आणि भुषण मुकुंदा पाटील यांनी या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. या कामाचे ठेकेदार विजय गोपिचंद पाटील यांनी गुणवत्तापूर्ण काम पूर्ण केले. ग्रामसेवक बि. पी. पाटील, ग्रामपंचायत पाणीपुरवठा शिपाई भरत देवसींग पाटील, ग्रामपंचायत शिपाई आबा विक्रम पाटील, शिपाई संघटना तालुका अध्यक्ष प्रमोद आनंदा पाटील आणि कॉम्प्युटर ऑपरेटर विश्वनाथ बबन अहीरे यांनीही या प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच, रोजगार सेवकांनीही या कामात सहभाग नोंदवला.
या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणामुळे गावातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. गावकऱ्यांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त केले असून, माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचे आभार मानले आहेत. हा रस्त्यामुळे गोराडखेडा खुर्द गावाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.