जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराष्ट्रीय
पाचोरा रेल्वे स्टेशनवर नवनिर्वाचित राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांचा जंगी सत्कार

पाचोरा, दि. २७ जुलै २०२५: जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आणि प्रसिद्ध विधी तज्ञ एडवोकेट उज्ज्वल निकम यांच्या राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल आज सकाळी पाचोरा रेल्वे स्टेशनवर त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास कांतीलाल शेठ जैन, वासू अण्णा महाजन, गोविंद भाऊ शेलार, भूषण दादा वाघ, विनोद पाटील, अविनाश सुतार यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. निकम यांनी आपल्या भाषणात जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सत्कार समारंभात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.