पाचोरा तालुक्यात टायगर ग्रुपतर्फे आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व शालेय वस्तू वाटप

पाचोरा, दि. 1 ऑगस्ट 2025: टायगर ग्रुप पाचोरा तालुका यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व शालेय वस्तू वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली. या शिबिरात तब्बल 45 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या, तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष पै. दिपक शंकरराव शिरसाठ, कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील, मातंग समाज जिल्हाध्यक्ष नानाभाऊ भालेराव, जयंती अध्यक्ष राहुल मरसाळे, पाचोरा शहर संपर्कप्रमुख विजय शंकरराव शिरसाठ, शहर अध्यक्ष अभिषेक नाथ, तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष मयूर दराडे, पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, डॉ. स्वप्निल दादा पाटील, डॉ. नीलकंठ दादा पाटील, निलेश बाविस्कर, सुनील अहिरे, विकास चंदनशिव, नाना अहिरे, रामेश्वर पाटील, मयूर शिंदे, भोला पाटील, नितीन शिरसाट, मनीष पाटील, कैलास मरसाळे, आदित्य अहिरे, लखन भालेराव, सुमित अहिरे यांच्यासह समाज बांधव आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पाचोरा तालुका यांनी या उपक्रमाद्वारे सामाजिक कार्यात आपले योगदान देत आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य केले.